विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी विचारी माणसांना आवाहन करणारी जाहीर सभा आयोजित केली होती.

दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५•४५ वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर पश्चिम येथे राजापूरची रिफायनरी व मेट्रो -३ या विध्वंसक व धोकादायक प्रकल्पांच्या विरोधात जागृती करण्यासाठी भारतीय पर्यावरण चळवळ, कोंकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना, मुंबई रक्षण समिती, दादर सार्वजनिक वाचनालय आणि इतर सामाविष्ट संस्था यांच्या वतीने विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी विचारी माणसांना आवाहन करणारी जाहीर सभा आयोजित केली होती.
आज इतर जीवसृष्टी जात्यात आहे. पण हे घडवणाऱ्याना याची जाणीव नाही की आपण सुपात आहोत व तापमानवाढीमुळे लवकरच जात्यात जाणार आहोत . ही जाणीव या सभेतून करण्यात आली. यावेळी प्रा. एच एम देसरडा, मा. न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील, डाॅ. शशीकुमार मेनन, सुश्री मधुकांता दोशी, ऍड. गिरीश राऊत, अशोकदादा वालम -अध्यक्ष, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना, कुंदन राऊत – तापमानवाढीमुळे जागृत, बांधकाम व्यवसाय सोडून नैसर्गिक शेतकरी, रामचंद्र भाडेकर, योगेश नाटेकर- राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्त, सौ. प्रणाली गिरीश राऊत, विश्वास नटे – ( माणगाव प्रकल्पग्रस्त ), विनायक पुजारी – राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्त, मनोज तिर्लोटकर – राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्त, कोंकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे कार्यकर्ते (प्रकल्पग्रस्त) आणि इतर विविध ठिकाणावरील सर्वसामान्य व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होत्या.

निसर्गाला हानिकारक सर्व प्रकल्प रद्द करण्यात यावे असे सर्वानुमतें सांगण्यात आले.

ह्या पर्यावरण सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती कि अक्षरशः माणसे खाली बसूनही वक्त्यांचे बोलणे ऐकत होती.

Leave a Reply