वाळवंटे पसरत आहेत. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केप टाऊन या शहर प्रदेशात सलग तिसरे वर्ष दुष्काळ आहे

वाळवंटे पसरत आहेत.
अॅड. गिरीश राऊत*
दक्षिण आफ्रिकेची राजधानी केप टाऊन या शहर प्रदेशात सलग तिसरे वर्ष दुष्काळ आहे.

त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतचा सोबतचा व्हिडिओ आपण पाहिला असेल .
जगभर सर्वत्र सहारा, मंगोलिया गोबी, राजस्थान, अरबस्थान, आॅस्ट्रेलिया इ. सर्व वाळवंटे पसरत आहेत.
कॅलिफोर्नियासारख्या फक्त ५० वर्षांपूर्वीपर्यंत हिरव्यागार असलेल्या प्रदेशाचे वाळवंटीकरण होत आहे.

काही जणांना वाटते त्याप्रमाणे हा भीती दाखवण्याचा प्रयत्न नाही. हे भीषण वास्तव आहे. भौतिक विकास प्रक्रियेमुळे सुमारे दहा पिढ्यांच्या अल्प काळात पृथ्वीवर हे संकट ओढवले
आहे.

मनातील कोणत्याही अडथळ्यांना न मानता हा कार्बन उत्सर्जन करणारा ऊर्जाग्राही व हरितद्रव्याचा नाश करणारा विकास तात्काळ थांबवला जावा अशी भूमिका मानवजातीने घेणे आवश्यक आहे. त्यानुसार जीवनशैली असावी. ही गोष्ट कोणतेही सरकार किंवा इतर कुणी करतील अशा अपेक्षांत वेळ दवडू नये. आपले आयुष्य आपण जगतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा हाच आशय व संदेश आहे.

धन्यवाद
आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक : भारतीय पर्यावरण चळवळ

Leave a Reply