पर्यावरण चळवळ सभा

महत्वाची जाहीर सभा मुंबईत अलिकडे कमला मिल कंपाउंडमधील गच्चीवरील पब आणि साकिनाक्याचे हाॅटेल भस्मसात होणे, एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत भर दिवसा डोळ्यादेखत २३ माणसे बळी पडणे अशा सुन्न करणाऱ्या दुर्घटना लागोपाठ घडत आहेत. रोज सुमारे २५ ते ३० माणसे रस्ते व रेल्वे अपघातात मरतात.

कचरा डंपिंग, वाढती हिंसा तणाव, गॅस चेंबर बनलेले हे शहर नागरिकांच्या अंगावर येत आहे. याला विकासाचा मुखवटा धारण करून पैशाचा खेळ करणाऱ्या, वाहतुक, जमीन वापर इ. क्षेत्रात केलेल्या अविचारी योजना कारण आहेत. सध्या राबवला जाणारा, नियोजनात नसलेला व मुंबईसाठी अनेक समस्या वाढवणारा मेट्रो-३ प्रकल्प या अविचाराचा कळस आहे.

त्याचवेळी तापमानवाढीमुळे मानवजातीचे पृथ्वीवरून उच्चाटन होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पॅरिस करार व इतर वैज्ञानिक परिषदा कार्बनचे उत्सर्जन थांबवणे आवश्यक असल्याचा गंभीर इशारा देत आहेत. तरीही उरलेल्या जैविक विविधतेचा खजिना असलेल्या निसर्गसंपन्न कोकणात राजापूरला प्रचंड तेल शुध्दीकरण + कोळसा जाळून वीजनिर्मिती करणारे विद्युत केंद्र + रसायन + प्लास्टिक निर्माण संकुल सर्व बाधित गावांच्या पूर्ण विरोधाचा अनादर करून आणण्यात येत आहे.
याचा शेतीमधील संकटाशी संबंध आहे.

ही विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी विचारी माणसांना आवाहन करणारी जाहीर सभा रविवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५•४५ वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर- प येथे आयोजित केली आहे.
वक्ते : र. ग. कर्णिक
प्रा. एच एम देसरडा
काळूरामकाका दोधडे
मा. न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील
खासदार अरविंद सावंत
डाॅ. शशीकुमार मेनन
सुश्री मधुकांता दोशी

अशोकदादा वालम -अध्यक्ष, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना
योगेश नाटेकर- राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्त
पांडुरंग सकपाळ- मेट्रो ३ भूयारी रेल्वे बाबत
रमाकांत पाठक- चरखा हातमागाचे प्रचारक
स्टालीन- मेट्रोपासुन आरे जंगल रक्षण
बाबूजी ढगे- विदर्भातील शेतकरी: तेथील भयंकर स्थितीबाबत
विक्रांत कर्णिक – उद्योग क्षेत्र त्यागून तापमानवाढीबाबत जागृती
कुंदन राऊत – तापमानवाढीमुळे जागृत, बांधकाम व्यवसाय सोडून नैसर्गिक शेतकरी

भारतीय पर्यावरण चळवळ
कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना
मुंबई रक्षण समिती व
दादर सार्वजनिक वाचनालय

 

सर्वांना आवर्जुन निमंत्रण.
कृपया सर्वत्र पाठवा.
www.indianenvironmentmovement.com

Leave a Reply